शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डनबाबांनी अंगावरील सोने घटविले

By admin | Updated: December 31, 2016 01:19 IST

गोल्डनबाबांनी अंगावरील सोने घटविले

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थपर्वानंतर प्रथमच त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या गोल्डनबाबा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कमी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आयकर विभागाची वक्रदृष्टी टाळण्यासाठी बाबांनी अंगावरील सोने कमी केल्याची चर्चा त्र्यंबकवासीयांमध्ये होत आहे.  त्र्यंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे महंत सुधीरकुमार मक्कड उर्फगोल्डनबाबा यांनी गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी केला. सिंहस्थ काळात गोल्डनबाबांचे त्र्यंबक येथे वास्तव्य होते. त्यानंतर ते हरिद्वार येथील आश्रमात परत गेले होते. सिंहस्थ काळात अंगावर १५ किलो सोन्याचे दागिने घालून फिरणारे गोल्डनबाबा गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे आले तेव्हा त्यांच्या अंगावर केवळ साडेचार किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. मानेवरील दुखण्यावर इलाज करण्यासाठी ते फरशीवाले बाबा यांच्याकडे आले होते. मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी ते रवाना झाले. या कार्यक्रमानंतर आपण त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आजच्या स्थितीमुळेच गोल्डनबाबा पंधरावरून साडेचार किलोवर आले असावेत, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती. दरम्यान, त्र्यंबक येथे आगमन झाल्यानंतर अनेक भाविकांनी गोल्डनबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. उद्योजक असलेले गोल्डनबाबा सर्वसंग परित्याग करून साधू बनले आहेत.