शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरांची युतीलाच पसंती टपालात गोडसे आघाडीवर; भुजबळांना पिछाडी

By admin | Updated: May 17, 2014 00:45 IST

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांनी केलेल्या पोस्टल मतदानातही सेनेचे हेमंत गोडसे यांनाच पसंती देण्यात आली आहे. एकूण मतदानाच्या निम्मे मतदान एकटे गोडसे यांना मिळाले असून, छगन भुजबळ दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांनी केलेल्या पोस्टल मतदानातही सेनेचे हेमंत गोडसे यांनाच पसंती देण्यात आली आहे. एकूण मतदानाच्या निम्मे मतदान एकटे गोडसे यांना मिळाले असून, छगन भुजबळ दुसर्‍या क्रमांकावर आहेत. निवडणुकीचे काम सोपविलेल्या कर्मचार्‍यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या व त्याचे वाटप प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले होते. ज्यांना पोस्टल मतपत्रिका देण्यात आली त्यांनी त्यावर आपले मत नोंदवून सदरचा लिफाफा पोस्टाद्वारे किंवा त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुरुवार, दि. १५ मे रोजी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. नाशिक लोकसभा मतदारसंघात २१९५ पोस्टल मते प्राप्त झाली होती. त्यातून गोडसे यांना ११३०, तर भुजबळ यांना ६७३ मते मिळाली. डॉ. प्रदीप पवार यांना ११४, विजय पांढरे यांना ३८, दिनकर पाटील यांना १३ व तानाजी जायभावे यांना १८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सखावतखॉँ पठाण यांना ३ मते मिळाली, तर ११ मतदारांनी यापैकी कोणी नाही असे म्हटले आहे. निवडणुकीचे काम करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांनी मतदान करताना चुका केल्याने सुमारे १९८ मते बाद ठरविण्यात आली आहेत. सकाळी आठ वाजता पोस्टल मतदान मोजण्यासाठी चार टेबल लावण्यात आले होते. अगोदर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. साधारणत: ११ वाजेपर्यंत ती पूर्ण करण्यात आली. अर्थात ही मोजणी करताना पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आला. सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे करण्यात आले व त्यानंतर मोजणीला सुरुवात करण्यात आली.