शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

धन्वंतरी जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी

By admin | Updated: October 28, 2016 23:31 IST

आयुर्वेदाचा जागर : वृक्षरथासोबत योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

नाशिक : पंतप्रधान कार्यालय व आयुष विभाग यांच्या निर्देशानुसार धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी (दि.२८) निमाच्या (एनआयएमए) नाशिक शाखेतर्फे आयुर्वेद दिंडी काढण्यात आली.भोसला मिलिटरी स्कूल गेट (मॉडेल कॉलनी) पासून आयुर्वेद दिंडीची सुरु वात झाली. यावेळी श्री साक्षी ढोलपथकासह ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी व योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रारंभी ग्रंथदिंडी त्यापाठोपाठ सजवलेल्या रथात धन्वंतरी देवतेसह चरक ऋ षींच्या वेशभूषेत बसलेली मुले, त्या मागे श्री साक्षी ढोल पथक त्यामागे विविध आयुर्वेदिक वृक्षांची माहिती देणारा वृक्षरथ आणि त्यामागे योगाचे प्रात्यक्षिक सादर केले जात होते. सर्वांत शेवटी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि डॉक्टर सहभागी झाले होते. दिंडीत महिलांनी हिरवी साडी व पुरु षांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग घेतला. भोसला मिलिटरी स्कूल गेट (मॉडेल कॉलनी) येथून निघालेली आयुर्वेद दिंडी कॉलेज रोडमार्गे डोंगरे वसतिगृह येथे पोहोचली. तेथे धन्वंतरीपूजन व स्तवन करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली.  आयुर्वेद दिंडीत हरित विश्व परिवार, त्र्यंबकेश्वर सेवा शिबिर, ग्रीन रिव्होल्युशन, इंदिरानगर आयुर्वेद मंडळ, आयुर्वेद महाविद्यालये, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महासंमेलन, आयुर्वेद व्यासपीठ, विविध आयुर्वेदीय औषधी वितरक व कंपन्या, विविध आयुर्वेद संघटना सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)