निफाड : येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या निशाचर ढोकरी पक्ष्याला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले.निफाड तहसील कार्यालय परिसरात जखमी अवस्थेत पडलेल्या ढोकरी पक्ष्याला बिरजू पठाण यांनी येथील पक्षिमित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले यांच्या दवाखान्यात तातडीने आणले. डॉ. डेर्ले यांनी या पक्ष्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला जखमी झाली होती. त्यातून रक्तस्राव सुरू होता.डॉक्टरांनी जखम स्वच्छ केल्यानंतर असे लक्षात आले की त्याचा पाय पूर्णपणे तुटला होता. जखम बरी होण्यासाठी पाय काढणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यानंतर पाय कापण्याचा निर्णय घेतला. सर्व निर्जंतुकीकरण प्रक्रि या करून त्याचा पाय कापला व औषधोपचार करून पट्टी केली. देखभालीसाठी पिंजऱ्यात ठेवले. बिरजू पठाण यांच्या सर्कतेमुळे आणि पक्षिमित्र डॉ. उत्तम डेर्ले यांनी योग्य ती काळजी घेतल्याने सदर पक्ष्यावर उपचार करून त्यास जीवदान दिले. गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षमित्रमंडळातर्फे अशाच एका पक्षाला जीवदान देण्यात आले होते. (वार्ताहर)
जखमी ढोकरीला दिले जीवदान
By admin | Updated: April 30, 2017 00:27 IST