पंधराव्या वित्त आयोगाचा लाभ द्या : बाल ग्रामसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 05:17 PM2019-12-08T17:17:00+5:302019-12-08T17:18:23+5:30

सिन्नर : पंधराव्या वित्त आयोगाचा लाभ आम्हा विद्यार्थ्यांनाही द्या, अशी मागणी तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या बाल ग्रामसभेत विद्यार्थ्यांनी केली.

 Give benefit to Fifth Finance Commission: Demand in Bal Gram Sabha | पंधराव्या वित्त आयोगाचा लाभ द्या : बाल ग्रामसभेत मागणी

पंधराव्या वित्त आयोगाचा लाभ द्या : बाल ग्रामसभेत मागणी

Next

पाडळीचे सरपंच  अरु णा रेवगडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल ग्रामसभा घेण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगात प्राथमिक, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा देण्याची तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी बाल सभा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरपंच रेवगडे यांच्याकडे अद्ययावत वाचनालय सुरू करून स्पर्धा परीक्षांची सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण यंत्र बसून द्यावे. तसेच विद्यालयातील ४० ते ५० मुली या दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येतात. त्यांच्यासाठी सायकलींची मागणी विद्यार्थ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली. तसेच मुलींच्या सक्षमतेसाठी व स्वसंरक्षणासाठी व्यायाम शाळा व व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सर्व विद्यार्थ्यांना टॅब, कलादालन, खेळ साहित्य, प्रोजेक्टर, सायकल स्टॅण्ड व शेड या मागण्या करण्यात आल्या. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विद्यालयाला एकुण अनुदानाच्या १० टक्के खर्च करावयाचा आहे. हा खर्च पाच वर्षात टप्प्याटप्प्याने करावयाचा असून यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. हा निधी विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जावा असे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मागण्या बाल सभेत मांडल्या व त्या सुविधा देण्याचे काम सरपंच व ग्रामसेवक तसेच सदस्य यांनी मान्य केले . विद्यार्थ्यांच्या मागणीला प्राधान्यक्र म देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा बिडवे, बी. आर. चव्हाण, आर.व्ही.निकम, एस.एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम.एम.शेख, एस.एस.देशमुख, टी.के.रेवगडे, सी.बी.शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए.बी.थोरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Give benefit to Fifth Finance Commission: Demand in Bal Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.