शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:03 IST

शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते.

नाशिक : शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते. नाशिकचा हा स्वरपक्षी शुक्रवारी दुपारी अनंतात विलीन झाला.मुंबईहून कारने परतताना गुरुवारी दुपारी अपघाती निधन झालेल्या गीता माळी यांच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गीता यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिकच्या लहान-मोठ्या कलाकारांसह हजारो कलारसिक उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी गीता यांच्या सातपूर येथील निवासस्थानी कलाप्रेमी रसिकांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. गीता यांची अशी चटका लावून जाणारी वार्ता समजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी अश्रुंचा महापूर वहात होता. सातपूरच्या निवासस्थानापासून निघालेली अंत्ययात्रा कालिदास कलामंदिरात आणण्यात आली. कालिदासमध्ये अंत्यदर्शन घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीला कालिदासचे प्रांगणदेखील अपुरे पडले होते. कालिदासमध्ये नाट्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तिथे काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवून तिथून पार्थिव प. सा. नाट्यगृहात आणल्यानंतर सावानाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक अमरधामला नेऊन अग्नीडाग देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, दत्ता पाटील, प्रिया तुळजापूरकर, मोहन उपासनी, विनोद राठोड यांच्यासह शेकडो रंगकर्मी, कलाकार, जनस्थान ग्रुपचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. १९ नोव्हेंबरला सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात सर्व कलाकार, रसिकांच्या वतीने शोकसभा होणार आहे.आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभाकालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सायंकाळी गीता यांच्या निधनाबद्दल जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभा घेण्यात आली. संघटनेचे संस्थापक उमेश गायकवाड, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सुनील ढगे यांनी गीता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोकभावना व्यक्त केल्या. गायकवाड यांनी गीता या उत्कृष्ट कलाकाराबरोबर उत्कृष्ट व्यक्ती असल्याचे सांगितले. गीताचा अपघाती मृत्यू हा काळजाला चटका लावणारा असल्याचे ढगे यांनी सांगितले. कारकिर्द ऐन बहरात असताना तिचे अकाली जाणे यावर विश्वासच बसत नसल्याचे जयंत पाटेकर म्हणाले. यावेळी वीरेंद्रसिग परदेशी, नंदू देशपांडे, रवी बराथे, विजय महंत, नवीन तांबट, राजेंद्र जाधव, प्रिति जैन, प्रदीप जगताप यांनीदेखील अनेक आठवणी ना उजाळा देत माळी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक