शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

गॅस दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 5:43 PM

सायखेडा : शासनाद्वारे उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्त्यांना शंभर रूपयांच्या सवलतीत माफक दरामध्ये उज्वला गॅस जोडणी दिली. परंतु याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. हा शंभरीतील गॅस आता नाका पेक्षा मोती जड वाटू लागला आहे.

ठळक मुद्देदमछाक : उज्वला गॅस जोडणी ठरतेय त्रासदायक

सायखेडा : शासनाद्वारे उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्त्यांना शंभर रूपयांच्या सवलतीत माफक दरामध्ये उज्वला गॅस जोडणी दिली. परंतु याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. हा शंभरीतील गॅस आता नाका पेक्षा मोती जड वाटू लागला आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर या आठवड्यात आठशे पन्नास रुपयांवर जाऊन धडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून सिलिंडरसाठी एकत्रित रक्कम जमविताना या लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने पैसे जमविताना दमछाक होत आहे.

             घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नाही. गॅस सिलिंडर खरेदी वेळी पूर्ण रक्कम द्यावी लागते. अनेक वेळा सामान्य नागरिकाकडे एकत्र रक्कम नसते.               मागील काही वर्षात शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शनधारकांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून अनेकांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील नागरिकांकडे सुद्धा गॅसची सोय झाली. वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सरकारने गॅस कनेक्शन सवलतीच्या दरात वाटले. परंतु गेल्या काही वर्षांत सातत्याने होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीची दरवाढ सामान्यांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. ही सबसिडी म्हणजेच अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतु मार्च पासून सबसिडी नाही आणि अनुदानही नाही. सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घेताना एकूण रक्कम ग्राहकांना जमा करावी लागते.

परंतु सर्वसाधारण कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणा-या व्यक्तिला एकाचवेळी ही रक्कम भरणे जड जात आहे. हळूहळू गॅसच्या दरातमध्ये सतत वाढ होताना दिसते. त्यामुळे गॅस कनेक्शन असूनही अनेक ग्राहकांना सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा,चुल सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे.चुली परत पेटल्या...गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत चालले असून गृहिणींचे नियोजन कोलमडून गेले आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील बंद केलेल्या चुली परत पेटल्या असुन महिलांना धुराच्या विळख्यात स्वयंपाक करण्याची पून्हा वेळ आली आहे.- भारती चव्हाण, सरपंच, औरंगपूर. 

टॅग्स :GovernmentसरकारRural Developmentग्रामीण विकास