शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

उद्याने की टवाळखोरांचे अड्डे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:11 AM

महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे.

सातपूर : महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक-९ मधील उद्याने याला अपवाद नाहीत. या प्रभागातील उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. उद्याने वाचविण्यासाठी स्थानिक नगरसेवक तक्रारी करतात, परंतु त्याची दखल मात्र प्रशासन घेत नाही. काही ठिकाणी स्थानिक नगरसेवक स्वखर्चाने देखरेख करीत असल्याने ही उद्याने जिवंत आहेत.प्रभाग क्रमांक नऊमध्ये उद्यानांसाठी मोठ्या प्रमाणात भूखंड राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्यातील बहुतांश उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये वृक्षलागवड करून उद्याने जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. बहुतांश उद्यानांमध्ये ‘ग्रीन जिम’ आणि खेळणी बसविण्यात आली आहेत. हिरवळ लावण्यात आली आहे. परंतु केवळ देखभालीअभावी ही उद्याने ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. काही उद्यानांमध्ये हिरवळ जतन करण्यासाठी पाण्याची पुरेशी सोय नाही. काही उद्यानांमध्ये बोअर असून नसल्यासारखी आहे. उद्यानातील कारंजे नादुरु स्त अवस्थेत आहेत. साफसफाई नियमित होत नाही. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. काही उद्यानांमध्ये केवळ हिरवळ आहे. त्यात पाहिजे त्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. मीनाताई ठाकरे उद्यानातील खेळणी दुरु स्त करण्याची मागणी होत आहे. श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात टवाळखोरांचा आणि मद्यपींचा अड्डा तयार झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अर्थात, कोणत्याही उद्यानात महापालिकेने देखभाल करण्यासाठी कोणालाही नेमलेले नाही. सुरक्षारक्षकाची (वॉचमन) नेमणूक केलेली नाही. त्यामुळे उद्यानातील खेळणी नादुरु स्त अवस्थेत आहेत. उद्यानांची प्रवेशद्वार मोडकळीस आलेले आहेत. उद्यानांच्या संरक्षक जाळ्यांचा वापर महिला कपडे सुकविण्यासाठी करीत आहेत. लहान मुलांची खेळणी मोठी मुले, माणसे खेळताना दिसतात. उद्यानातील झाडांना आणि हिरवळीला पाणी देण्याची सोय नाही. या दुरवस्था महापालिका प्रशासनाने थांबविणे गरजेचे आहे.टवाळखोरांचा नागरिकांना त्रासनागरिकांसाठी ही उद्याने असली तरी काही उद्यानांमध्ये टवाळखोर आणि मद्यपींचा धिंगाणा आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रेमी युगुलांसाठी ही उद्याने आणि उद्यानातील वृक्ष मोठे आधार ठरत आहेत. विशेत: श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात हे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकार वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात अनर्थ घडू शकतील. त्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.नगरसेवक खर्चातून उद्याने जगवण्याचा प्रयत्नमहानगरपालिका प्रशासन उद्यानांची व्यवस्थित देखभाल करीत नाही म्हणून स्थानिक नगरसेवकांनी स्वखर्चाने आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरजू कुटुंबांना उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. देखभाल करणाºयांना दरमहा मानधन (वेतन) दिले जात आहे. त्यामुळे ही उद्याने जिवंत आहेत. वास्तविक ही जबाबदार महानगरपालिका प्रशासनाची घेणे अपेक्षित आहे. शिवाजीनगर येथील भवर टॉवरजवळील उद्यानाची कोणीही देखभाल करीत नसल्याने या उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे.उद्यानाच्या देखभाली-साठी वाचमन नेमला पाहिजे. उद्यानाचा अजून विकास करावा. साफसफाई नियमित करण्यात यावी. लहान मुलांसाठी वेगळी खेळणी बसविण्यात यावीत. महिला व्यायामासाठी येतात. त्यांना असुरिक्षत वाटू नये.  - नाना शिवाजी केतान, नागरिकप्रभागातील कोणत्याही उद्यानात सुरक्षारक्षक नाहीत. सुविधा नाहीत. साफसफाई नियमित होत नाही. काही उद्यानात कचºयाचे ढीग आहेत. उद्याने चांगली आहेत. परंतु केवळ देखभालीअभावी उद्यानांची दुरवस्था निर्माण होऊ शकते. महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.  - गणेश पाटील, स्थानिक नागरिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक