Gandhigiri of the police with a rose flower | गुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी

ओझरला रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांचे गुलाबपुष्प देऊन गांधीगिरीने स्वागत करताना पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे, पानसरे आदी.

ठळक मुद्देपुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर भरकटकणाºया वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गावातील प्रत्येक चौकात संचलन करून कोरोनाचे गांभीर्य न घेता गावात व इतरत्र मास्क न वापरता फिरणाºया वाहनधारकांना अडवून गुलाबपुष्प दिले. त्यांना न फिरण्याची तंबी दिली. आता पुष्प देतो पण पुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.
यावेळी भगवा चौक, चांदणी चौक, शिवाजी चौक, मेनरोड आदी भागातून संचलन केले. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे, पानसरे, एकनाथ हळदे, बैरागी, अरु ण गायकवाड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. गावातील मेडिकल, बँका, किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.
एकनाथ हळदे आदी.

Web Title: Gandhigiri of the police with a rose flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.