जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:37 AM2019-03-25T00:37:53+5:302019-03-25T00:38:13+5:30

वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 Gambling raid; Seven people were arrested | जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

Next

पंचवटी : वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी या संशयितांकडून १५ हजार रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगतच्या मेरी वॉल कम्पाउंडजवळील भिंतीलगत काही युवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी महेश साळुंके व त्यांच्या पोलीस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगार खेळणाºया संशयित बबलू नहिरे, मोहन पाटील, कोमल शेख, भारत पुराणिक, लक्ष्मण पानकर, बाळासाहेब जाधव व प्रशांत वालेकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची रोकड केली आहे. दरम्यान, पंचवटी परिसरात मटका, दारू, पत्त्यांचे क्लब याशिवाय मोबाइलवर रोलेट गेम यांसारखे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांकडून मटका, जुगार, अड्ड्यांवर छापा टाकला जात असला तरी मोबाइलवर रोलेट गेम चालविणाºया अवैद्य धंदेचालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
दुचाकी चोरणाºया दोघांना अटक
अशोकामार्ग भागातून दुचाकीवरून जाणाºया मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून, या घटनेतील संशयित आरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे.
तुळजाभवानी मंदिराजवळ राहणारा रंगकाम व्यावसायिक संदीप हिरालाल गुप्ता त्याच्या मित्रासमवेत अशोकामार्ग परिसरातून जात असताना संशयित आरोपी सागर मंगेश भडांगे (२३) व दिलीप देवराम महाले (२९) मोठमोठ्याने आरडाओरडा करीत आम्ही पोलिसांना घाबरत नसल्याचे सांगत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी संदीप गुप्ता व त्याच्या मित्रांना अडवून गुप्ता याच्या गळ्याला चाकू लावून दुखापत केली. तसेच त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम.एच ४१ एच ६९९ बळजबरीने हिसकावून चोरून नेली. या झटापटीत आरोपींनी गुप्ताच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपयेही बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भडांगे व महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ यांनी सांगितले.
इंदिरानगरमधे विवाहितेची आत्महत्या
पाथर्डी रस्त्यालगत साईप्रसाद अपार्टमेंटच्या गच्चीवर एका विवाहितीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पाथर्डी रस्त्यालगतच्या साईप्रसाद अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर ११ मधील रहिवासी मैना विजय धानानी (३४ ) यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यामुळे गंभीर भाजल्या गेल्याने त्यांचा दीर परेश रणछोड धानानी यांनी त्यांना तातडीने मैना रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. जिल्हा रुग्णालयाचील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजते.
मारहाण करणाºया दोघांना चार वर्षे सक्तमजुरी
आडगाव नाका परिसरात २३ जानेवारी २०१३ रोजी एका बारमधील मॅनेजरला मारहाण करीत गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पांडुरंग घुले यांनी चार वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पंचवटीतील नागचौक येथील सागर गरड, विकी शिंदे, असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आडगाव नाका येथील पल्लवी बारचे मॅनेजर मनोज साळुंके यांनी या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर मॅनेजर यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केल्याने याचा राग येऊन आरोपींनी लोखंडी गज व काठीने साळुंके यांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश देवरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला.

Web Title:  Gambling raid; Seven people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.