शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

फ्युजन, जसरंगी अन् जुगलबंदी!

By admin | Updated: March 18, 2015 00:28 IST

रंग त्रितालाचे : संगीत महोत्सवात तिहेरी पर्वणी; पं. विजय घाटे, पं. भवानीशंकर यांच्या वादनाने रसिक तृप्त

नाशिक : पाश्चिमात्त्य व भारतीय संगीताच्या मिलाफातून रंगलेले तबला सहवादन...त्यानंतर ख्याल गायनाची अनोखी ‘जसरंगी’ अन् तबला, पखवाज व संवादिनीच्या जुगलबंदीने गाठलेला कार्यक्रमाचा कळस... नाशिककर संगीत रसिकांना ही तिहेरी पर्वणी लाभल्यानंतर प्रत्येकाची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच झाली...निमित्त होते एसडब्ल्यूएस फायनान्शियल व श्री गुरुकृपा तबला परफॉर्मिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंग त्रितालाचे’ या कार्यक्रमाचे. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना पं. जयंत नाईक यांची होती. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गुरुकृपा अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या ‘फ्युजन’ तबला सहवादनाने झाली. पाश्चिमात्त्य व भारतीय संगीताचा त्यात सुरेख मिलाफ साधण्यात आला. तबल्यावर घराणे पद्धतीने पेशकार, कायदे, पारंपरिक बंदिशी अन् ड्रम, झेंबेची लयकारी यातून निघणारा नाद रसिकांची दिलखुलास दाद घेऊन गेला. त्याच्या साथीला होते बासरी, गिटारचे स्वर अन् गायन... निमिष घोलप, ओंकार भुसारे, प्रद्युम्न शेजवळकर, ओंकार अपस्तंभ, बल्लाळ चव्हाण, आदित्य कुलकर्णी, शौनक राजहंस, व्यंकटेश तांबे, उमेश खैरनार यांनी तबलावादन केले, तर ज्ञानेश्वर कासार (गायन), सुभाष दसककर, ईश्वरी दसककर (संवादिनी), अनिरुद्ध भूधर (गिटार), मोहन उपासनी (बासरी) यांनी साथ केली. प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, सिन्नरचे त्र्यंबकबाबा भगत, गजानन सराफ, भास भामरे, रघुवीर अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. अविराज तायडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. गायन, वादनामुळे आनंदाची निर्मिती होते आणि आनंद हे देवाचे रूप असते. सध्याच्या तणावाच्या वातावरणात पूर्वीप्रमाणे कीर्तनांसारखी एकत्र आनंद लुटण्याची संधी मिळत नाही; मात्र यानिमित्ताने ती चालून आल्याचे ते म्हणाले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)