शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अंत्यकर्म, श्राद्धविधी करता येतील स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:47 PM

नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपंचांगकर्त्यांचा दावा । कोरोना संकटामुळे अनेकांना धार्मिक विधी करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउनही घोषित केले आहे. या संकटकाळात सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद ठेवली आहेत. शिवाय धार्मिक विधीही थांबविण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, त्रिपिंडीसारखे विधी स्थगित करण्यात आले आहेत तर नाशिकला रामकुंडावर दशक्रि या विधीसह अन्य विधीसाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक असेल तरच विधी होत आहेत. पण त्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संचारबंदीमुळे सर्व खासगी वाहने, बसेस यांना रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा वेळी कुणाच्या कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याच्या अंत्यविधीनंतर अंत्यकर्म आणि श्राद्धविधी करण्यात अडचणी येत आहेत. अस्थिविसर्जनासाठीही रामकुंडावर पोहचणे अनेकांना अवघड होऊन बसले आहे. अशा आपतकालीन परिस्थितीत अंत्यकर्म आणि श्राद्ध विधी सवडीनुसार नंतरही करता येतील, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे.सप्तशती पाठकोरोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वत्र पूजा-पाठ, प्रार्थना केल्या जात आहेत. नाशिक येथील रामकुंडाजवळील गंगा-गोदावरी मंदिरात पुरोहित संघातर्फे सप्तशती पाठ सुरू आहेत. अतुलशास्री गायधनी हे पाठ वाचन करत आहेत.सध्याचे संकट असलेले वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तरी सर्व अस्थि विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधि करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत आणि त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा ११व्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक ११व्या दिवशी संपते; त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यानंतर करता येईल. तसेच प्रथम वर्षश्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावास्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथमवर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्र संमत आहे- मोहन दाते,दाते पंचांगकर्ते, सोलापूर

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी