शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:40 PM

खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार जे. पी. गावित यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देखड्डेमुक्त रस्ते अभियान : आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काम

कळवण : खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार जे. पी. गावित यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मार्च २०१९ अखेर तालुका खड्डे मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.ग्रामीण भागातील न जोडलेली गावे आणि लोकवस्त्या बारमाही रस्त्यांव्दारे जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या; परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जावाढीसाठी व वाड्या-वस्त्यांसाठी रस्त्यांची नवीन जोडणीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कळवण तालुक्यातील रस्ते विकासकामांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वरखेडा- करंभेळ-दळवट-जामले-दरेगाव- तताणी- शृंगारवाडी या रस्त्यांच्या विकासकामांसाठी सात कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले असल्याने या रस्त्यांच्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शैलेश पवार व पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ गायकवाड यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे आमदार गावित यांनी यावेळी सांगितले.कळवण तालुक्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाळा संपल्यानंतर आदिवासी सार्वजनिकबांधकाम विभागाकडून संबंधित तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामास गती देऊन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना आमदार जे.पी. गावित यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, हेमंत पाटील, रघुनाथ खांडवी, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, बाळासाहेब गांगुर्डे, मधुकर पाटील, टीनू पगार, अतुल पगार, रशीद शेख, शिवाजी वळीणकर, दामू पवार, किरण शिरसाठ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNashikनाशिक