शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पूर्णवेळ तहसीलदारासाठी आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:28 AM

बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथा नागपूर येथील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाºयांनी दिला आहे.

सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथा नागपूर येथील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाºयांनी दिला आहे.बागलाणला गेल्या आठ महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे रेंगाळली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी दाखलेदेखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पूर्णवेळ तहसीलदाराची नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गत सहा महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. वारंवार लेखी निवेदन देऊन, तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न आणि अखेर आत्मदहनाचा प्रयत्न करूनही आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नसल्याने मनसे पदाधिकाºयांनी थेट नाशिक विभागीय महसूल आयुक्तालय गाठत कायमस्वरूपी तहसीलदारांची मागणी केली आहे. यावेळी महसूल उपायुक्त स्वामी यांनी दोन दिवसांत कायमस्वरूपी तहसीलदार नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, वैभव सोनवणे, शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, मनसे उपशहर अध्यक्ष निलेश नंदाळे, उपशहर अध्यक्ष हेमंत इंगळे, उपतालुकाध्यक्ष विश्वास खैरनार उपस्थित होते. मनसे पदाधिकाºयांनी सुरु वातीला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतरही दखल घेतली गेली नाही. तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदेखील लवकरच कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र पूर्णवेळ तहसीलदार न मिळाल्याने मनसे  पदाधिकाºयांनी गेल्या आठवड्यात तहसील आवारात थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मागणी मान्य न झाल्याने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

टॅग्स :commissionerआयुक्तMNSमनसे