शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा

By admin | Updated: January 5, 2016 23:18 IST

निफाड : कॅमसन कंपनीकडून फसवणूक

निफाड : कॅलनोव्हा औषध वापरल्याने झालेल्या नुकसानीची कॅमसन कंपनीने भरपाई द्यावी, यासाठी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सोमवारी मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत निवेदन दिले.निफाड तालुक्यातील खेडे, कारसूळ, खडक माळेगाव, रौळस, दिंडोरी तास, गाजरवाडी, नैताळे, अहेरगाव, पालखेड, पाचोरा, लोणवाडी या गावांतील द्राक्ष उत्पादकांनी ‘कॅमसन कंपनीकडून भरपाई मिळालीच पाहिजे, बंद करा बंद करा कॅमसन कंपनी बंद करा, द्राक्ष उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा मोर्चात दिल्या. मोर्चाचे नेतृत्व देवेंद्र काजळे, माणिक शिंदे यांनी केले. मोर्चाचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. माणिक शिंदे यांनी शेतकऱ्यांची कॅमसन कंपनीच्या कॅलनोव्हा औषधामुळे झालेल्या नुकसानीची प्रचलित बाजारभावाने भरपाई मिळावी व कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ कॅमसन कंपनीकडून प्रचलित बाजारभावाने भरपाई द्यावी व कंपनीवर नुकसानीबाबत शासनाने फौजदारी कारवाई करावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन अधिक तीव्र करून उपोषण, रास्ता रोको आंदोलन शेतकरी कुटुंबांसह केले जाईल, असा इशारा देवेंद्र काजळे यांनी दिला. शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देऊन कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली. या मोर्चात ज्ञानेश्वर ताकाटे, संजय थेटे, संजय सुराशे, कैलास शिंदे, प्रकाश पगार, सोमनाथ कुंदे, योगेश शंखपाळ, मच्छिंद्र शिंदे, भिका जाधव, मोहन शिंदे, विशाल शिंदे, दीपक गायकवाड, कुंदन बाजारे, सुनील शिंदे, श्रीराम चौधरी, विष्णू शिंदे, सुरेश गहिले, शांताराम शिंदे, आदिंसह शेकडो नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार उपस्थित होते. (वार्ताहर)