मुंढे यांच्या समर्थनार्थ आज शहरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:55 IST2018-11-29T00:54:51+5:302018-11-29T00:55:06+5:30
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, यासाठी गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंढे समर्थकांच्या भूमिकेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच अतुल पेठे यांच्यासह अन्य अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

मुंढे यांच्या समर्थनार्थ आज शहरात मोर्चा
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, यासाठी गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंढे समर्थकांच्या भूमिकेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच अतुल पेठे यांच्यासह अन्य अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
तुकाराम मुंढे यांची शासनाने बदली केली असली तरी नाशिकच्या विकास प्रकल्पांच्या दृष्टीने ती रद्द करावी, अशी मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवरच गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार असून, त्यासाठी विविध व्यावसायिक घटक तसेच सामाजिक आणि पुरोगामी कार्यकर्त्यांनी नाशिककरांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती सचिन मालेगावकर यांनी दिली.