शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

By अझहर शेख | Updated: February 8, 2023 13:47 IST

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.

नाशिक : वन्यजीवांची शिकार, तस्करीवर अंकुश बसावा व नामशेष होऊ पाहणाऱ्या वन्यप्राणी, पक्षी, सर्प प्रजातींचे संरक्षण, संवर्धन व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून भारतीय वन्यजीव कायद्यात दुरुस्ती करत काही सुधारणा करण्यात आल्या. यामुळे आता कोल्हा, उदमांजर, मुंगुस, तरस अन् साळींदरसारख्या वन्यप्राण्यांनाही वन्यजीव संरक्षण अनुसूची-१मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांची शिकार केल्यास संबंधितांना कठोर शिक्षा भोगावी लागू शकते.

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करत शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. दंडाच्या रकमेतही वाढ करून २५ हजारांच्या दंडाची शिक्षा आता थेट लाखावर जाऊन पोहोचली आहे.    

वन्यजीव कायद्यातील या सुधारणांमुळे यापूर्वी शेड्यूल-२ किंवा ४ मध्ये असलेल्या वन्यजीवांना थेट शेड्यूल-१मध्ये स्थान दिले गेले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची स्थिती भविष्यात अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

साळींदर थेट अव्वलस्थानी यापूर्वी साळींदर (सायाळ) हा वन्यप्राणी अनुसूची-४ मध्ये होता; मात्र आता त्याचा समावेश अनुसूची-१मध्ये करण्यात आला आहे. यासह रानपिंगळा घुबडानंतर श्रृंगी घुबडालाही अनुसूची-१मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुंगसाच्या सर्व प्रजातींनाही अनुसूची-१मध्ये अव्वलस्थान देण्यात आले आहे. यामुळे मुंगसाची शिकार किंवा त्यास कैद केल्यास कारावासासह मोठा दंडदेखील भरावा लागू शकतो.

...आता हे पक्षी अनुसूची-१मध्ये श्रृंगी घुबड, बहिरी ससाणा (फाल्कन), शिक्रा, राखी धनेश, निळा माशीमार (ब्लू फ्लायकॅचर), काळ्या मानेचा करकोचा, कॉमन क्रेन, डोमिसेल क्रेन, सायबेरियन क्रेन, सारस क्रेन, कॉमन पोचार्ड (लहान लालसरी), दुर्मीळ युरेशियन स्पुनबिल (दर्वीमुख)

राज्यप्राणी शेकरुसुद्धा अनुसूची १मध्ये महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु यापूर्वी अनुसूची-२मध्ये होता; मात्र, सुधारणेनंतर त्यास आता अनुसूची-१मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे शेकरुच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. नाशिकमध्ये शेकरुला चक्क एका पेट शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता. या प्राण्याचा संरक्षण दर्जा आता वाढविल्यामुळे वाघ, बिबट्याप्रमाणे त्यालाही स्थान दिले गेले आहे. 

टॅग्स :forestजंगलNashikनाशिक