शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 18:53 IST

निधीची लूट : अपर जिल्हधिकाऱ्यांनी दिला निकाल

ठळक मुद्देग्रामस्थ रंजक दौलत ढोकळे यांनी वरील चार सदस्यांविरु द्ध दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजी नाशिकच्या जिल्हाधिका-यांकडे तक्र ार अर्ज दाखल केला होता.

येवला : तालुक्यातील डोंगरगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी अपात्र घोषित केले आहे. डोंगरगावचे ग्रामस्थ रंजक दौलत ढोकळे यांच्या तक्र ार अर्जावरु न ग्रामपंचायत सदस्य बाबुराव गजानन सोमासे, विजय साहेबराव मोहन, श्रीमती रु पाली केशव पगारे, सौ. शिल्पा पोपट सोमवंशी हे चार सदस्य अपात्र ठरले आहेत. यामुळे शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी मनमानी पद्धतीने लुटणा-या गाव पुढाऱ्यांना चाप बसला आहे.डोंगरगांव येथील ग्रामस्थ रंजक दौलत ढोकळे यांनी वरील चार सदस्यांविरु द्ध दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजी नाशिकच्या जिल्हाधिका-यांकडे तक्र ार अर्ज दाखल केला होता. सदर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करून स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबियांचा लाभ करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. जिल्हाधिका-यांनी सदर प्रकरण अपर जिल्हाधिका-यांकडे वर्ग केले होते.येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सदर तक्रारीची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते, त्यानुसार गट विकास अधिका-यांनी १३ मार्च २०१९ रोजी अहवाल सादर केला. अपर जिल्हाधिका-यांकडे सुनावणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी यांनी अर्जदार व सामनेवाले यांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देवूनही त्यांनी कोणताही युक्तिवाद केला नाही. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे पाहून गुणवत्तेवर निर्णय घेण्यात आला. संबंधित सदस्यांनी जाणूनबुजून ग्रामपंचायत कामकाजात स्वत: चा व कुटुंबीयांचा आर्थिक लाभ घेतल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) चा भंग केल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या चारही सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद उर्विरत कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या निकालामुळे तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी