शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील चार घरकुले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:54 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

ठळक मुद्देभाडेकरू ठेवले : महापालिकेची कारवाई

लोकमत प्रभावनाशिक : वडाळागाव घरकुल योजनेतील निवासस्थानाचा गैरवापर केला जात असल्याबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे वतीने घरकुल योजनेतील घरांची तपासणी केली असता चार घरकुले मालकांनी भाडेकरूंंना दिल्याचे आढळून आल्याने ही चारही घरे सील करण्याची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यासाठी मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केल्या होत्या. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची तपासणी करून महापालिकेने लाभार्थी निवडले होते व त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरे वाटप केली. मात्र यापैकी काही जणांना घरकुल योजनेची गरज नसतानाही घरे घेतली आहेत. तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. ज्यांना गरज नाही अशा मिळकतधारकांनी घरकुल योजनेतील घरे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला असून, जेव्हा मनपाच्या वतीने घरात लाभार्थी राहतो की नाही तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येतात त्यावेळी त्यांना आधीच माहिती होत असल्याने त्यावेळेस स्वत: लाभार्थी घरी हजर राहतो. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात. अलीकडेच यासंदर्भातील लोकमत वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अचानक वडाळागावातील घरकुल योजनेत जाऊन सदर घरकुलांमध्ये मालक राहतो की भाडेकरू याची तपासणी केली असता चार घरांमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत. अशा घरांचा पंचनामा करून सील करण्यात आले आहे. सदर मोहीम कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे ५० टक्के घरे संबंधित लाभार्थ्यांनी भाडेतत्त्वावर दिली असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्याठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका