शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 00:24 IST

वाढत्या घटना : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना कायम असून, गेल्या दोन दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांची संख्या तीसच्या घरात पोहोचली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी नैराश्येत सापडले असताना शासकीय व प्रशासकीय पातळीवर मात्र हात बांधण्यापलीकडे काहीच केले जात नाही. सोमवारी १ मे महाराष्ट्रदिनी निफाड ताालुक्यातील उगाव येथे राहणारे शंकर सखाराम जगताप (५२) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, तर बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील नितीन कडू बिरारी (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना कायम असताना दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील भगवान नानू गावित (४५) या शेतकऱ्याने अंगावर घासलेट ओतून स्वत:ला पेटवून घेतले, त्याला उपचारार्थ हलविले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. या चौघांच्या आत्महत्येने जिल्ह्णात आजवर ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, प्रशासकीय पातळीवर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी गोळा करण्यापलीकडे काहीच केले जात नाही. शासनाने गेल्या वर्षीच शेतकरी आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शासकीय योजनांतून मदत करण्याबरोबरच कर्जबाजारी शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी मेळावे भरविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे सुरगाणा या आदिवासी भागातही आत्महत्येचे लोण पसरू लागले असून, प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे.शेतकरी महिलेची आत्महत्याजिल्ह्णातील निफाड तालुक्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना यंदा पहिल्यांदाच घडली आहे. गेल्या वर्षीही एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. निफाड तालुक्यातील गाजरेवाडी येथे राहणारी अश्विनी संदीप गाजरे हिने माहेर धारणगाव येथे वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली तिच्या नावावर गाजरेवाडी येथे शेती नाही; मात्र वडिलांच्या नावावर शेती आहे. त्यामुळे प्रशासनाने गाजरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. शेतकऱ्याचे विष प्राशनजायखेडा/द्याने : कर्जाचा वाढता बोजा त्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान यामुळे करंजाड येथील शेतकरी सुनील शांताराम देवरे (३१) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शांताराम देवरे यांच्या नावावर ३ एकर शेती असून ते कुटूंबाचा उदरिनर्वाह करतात. त्याच्यावर करंजाड विविध कार्यकारी सोसायटीचे १ लाख ५० हजार रु पयांचे पिक कर्ज तसेच ४० हजारांचे सोने तारण कर्ज होते. गारपीटमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या नैराश्यातून सुनील देवरे यांनी जीवन यात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.