नाशिक जिल्ह्यात २३ लाखांचे विदेशी मद्य जप्त

By प्रसाद गो.जोशी | Updated: March 30, 2024 21:17 IST2024-03-30T21:17:00+5:302024-03-30T21:17:53+5:30

वाहनचालक ओमप्रकाश हिरालाल यादव यास अटक करण्यात आली आहे.

Foreign liquor worth 23 lakh seized in Nashik district | नाशिक जिल्ह्यात २३ लाखांचे विदेशी मद्य जप्त

नाशिक जिल्ह्यात २३ लाखांचे विदेशी मद्य जप्त

देवळा (संजय देवरे) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालेगाव येथील गस्ती  पथकाने देवळा तालुक्यात एका वाहनात अवैधरीत्या दडवलेला २३ लाख १३ हजार रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा व वाहन जप्त केले. याप्रकरणी वाहनचालक ओमप्रकाश हिरालाल यादव यास अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहीता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालेगाव येथील पथकाने शनिवार दि. 30 रोजी नाशिक _ देवळा रोडवर, रामेश्वर शिवारात सापळा रचुन वाहन तपासणी करतांना एक पांढऱ्या रंगाची आयशर (क्र.एम एच ०८ डब्ल्यू ७७२२ ) ची तपासणी केली असता चोर कप्प्यात लपवलेले विदेशी मद्याच्या बाटल्यांनी भरलेले २०१ बॉक्स सापडले. कारवाईमध्ये वाहनासह एकुण २३ लाख १३ हजार ८०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर वाहनचालक तसेच गुन्हयातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहनमालक यांचे विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक लिलाधर पाटील पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Foreign liquor worth 23 lakh seized in Nashik district