शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुणे रवाना; यजमान पक्ष्यांचा मुक्काम !

By admin | Updated: March 1, 2017 00:51 IST

नाशिक : थंडी परतली असली तरी राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य अर्थात राज्याचे भरतपूर स्थलांतरित पक्ष्यांनी अजूनही गजबजलेले आहे.

नाशिक : थंडी परतली असली तरी राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य अर्थात राज्याचे भरतपूर स्थलांतरित पक्ष्यांनी अजूनही गजबजलेले आहे. यामुळे पक्षिप्रेमींची ‘वीकेण्ड’ला गर्दी वाढत आहे. नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षीसंमेलनाचा कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर जरी असला तरी सध्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. अभयारण्याचा झालेला विकास, न्याहारीची सोय, उद्यान, मूलभूत सोयीसुविधांमुळे पर्यटकांच्या पसंतीचे ‘डेस्टिनेशन’ बनले आहे. सध्या विविध प्रजातींचे एक डझन पक्षी अभयारण्यात मुक्तपणे विहार करताना दिसून येतात. यामध्ये देशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या जास्त आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण यंदा जास्त होते. त्यामुळे पक्षिप्रेमींसाठी जणू ही पर्वणीच ठरली. पक्षिसंमेलनाचा कालावधी संपला असला तरीदेखील अभयारण्यात काही पक्ष्यांचा मुक्काम अजूनही पहावयास मिळत असल्याने पक्षिप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षिप्रेमींकडून पसंती दिली जात आहे. आॅक्टोबर अखेरच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागली होती. डिसेंबरअखेरपर्यंत विदेशी पाहुणे येथील जलाशयावर मुक्कामी होते. त्यानंतर पाहुणे परतीच्या प्रवासाला लागले असले तरी यजमानाच्या भूमिकेत असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास संमेलनस्थळी अद्याप कायम आहे. (प्रतिनिधी)