शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

परवानाशुल्काची सक्तीने वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:26 IST

नाशिक : कोरोनामुळे गेली दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दुकान उघडलेल्या मद्यविक्रेत्यांनी आता ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांची विविध मार्गाने अडवणूक करण्यास सुरुवात केली असून, एरव्ही येईल त्याच्या हातात मद्याची बाटली सोपविणारे विक्रेते आता ग्राहकाला मद्याच्या किमतीबरोबरच ते प्राशन व बाळगण्यासाठीच्या परवान्यासाठी आग्रह धरून वसुली करू लागले आहेत. विशेष म्हणजे काही ठराविक दुकानदारच या कामी आग्रही असून, काही दुकानदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने परवाना शुल्काच्या वसुलीबाबत शासनाची संमती आहे की, दुकानदार स्वत:च याबाबत आग्रही आहेत त्याचा खुलासा मात्र होऊ शकलेला नाही.

नाशिक : कोरोनामुळे गेली दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दुकान उघडलेल्या मद्यविक्रेत्यांनी आता ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांची विविध मार्गाने अडवणूक करण्यास सुरुवात केली असून, एरव्ही येईल त्याच्या हातात मद्याची बाटली सोपविणारे विक्रेते आता ग्राहकाला मद्याच्या किमतीबरोबरच ते प्राशन व बाळगण्यासाठीच्या परवान्यासाठी आग्रह धरून वसुली करू लागले आहेत. विशेष म्हणजे काही ठराविक दुकानदारच या कामी आग्रही असून, काही दुकानदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने परवाना शुल्काच्या वसुलीबाबत शासनाची संमती आहे की, दुकानदार स्वत:च याबाबत आग्रही आहेत त्याचा खुलासा मात्र होऊ शकलेला नाही.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २३ मार्चपासून शासनाने सर्व प्रकारच्या मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश काढले होते. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली असली, या काळात तळीरामांच्या जिवाची घालमेलही कोरोनापेक्षा अधिक होती. मात्र शासनाने टप्पाटप्याने संचारबंदी व लॉकडाउन उठविण्यास सुरुवात केल्याने गेल्या आठवड्यापासून मद्यविक्रीही विशिष्ट कालावधीसाठी खुली केली आहे. सुरुवातीच्या दोन दिवस मद्यदुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या, या दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार ग्राहकांची गर्दी टाळण्याच्या उपाययोजना केल्या असून, त्यानुसार दुकानदार त्याची अंमलबजावणी करीत असले तरी, ग्राहकांची गरज व मागणी लक्षात घेऊन काही दुकानदारांनी प्रत्येक ग्राहकाला मद्यप्राशन व बाळगण्याचा शासन परवाना सक्तीचा केला आहे. एखाद्या ग्राहकाकडे मोजकेच पैसे असतील तर त्याला परवानाअभावी मद्य देण्यास मज्जाव केला जात आहे. अर्थात काही विशिष्ट दुकानदारांनी अशी भूमिका घेतली असली तरी, काही दुकानदार मात्र परवान्याशिवायही मद्यविक्री करीत आहेत. त्यामुळे एका दुकानावर एक व दुसऱ्याला दुसरा न्याय कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रत्येक मद्यविक्रीला जर परवाना सक्तीचा असेल तर इतर दुकानदार परवाना न देताही मद्याची विक्री कशी करीत आहेत? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक