शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत

By admin | Updated: July 28, 2014 23:27 IST

पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत

 

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचा उद्भव कोरडा पडल्याने योजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला होता. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जेसीबीद्वारे चर खोदून मृत पाणीसाठा विहिरीत वळविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. पावसाळा सुरूहोऊन दीड महिना उलटल्यानंतरही भोजापूर धरणात नवीन पाण्याची आवक झाली नाही. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिमपट्ट्यातही यावर्षी पाऊस नसल्याने म्हाळुंगी नदी कोरडी ठाक आहे. त्यामुळे यावर्षी भोजापूर धरणात पाणी आले नाही. भोजापूर धरणातून कणकोरीसह पाच गाव व मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा राबविण्यात आल्या आहेत. पावसाळा नको तेवढा लांबल्याने भोजापूर धरणात जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे. पाणी आटल्याने कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे नांदूरशिंगोटे, मानोरी व कणकोरी या गावांचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला होता. विहीर कोरडी पडल्याने मृत पाणीसाठा विहिरीत वळविणे गरजेचे होते. त्यानुसार नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवारे, उपसरपंच रवींद्र शेळके, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अनिल सांगळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, श्रीकांत वाघचौरे, मंगेश शेळके, पांडुरंग आगिवले, पाणीपुरवठा कर्मचारी रख्मा उघडे, अशोक गोसावी, विकास सूर्यवंशी यांनी भोजापूर धरणावर जाऊन जेसीबीच्या सहाय्याने चर खोदण्यास प्रारंभ केला. रविवारी रात्री १० वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे ८० फूट लांबीची नाली खोदण्यात आली. त्याद्वारे मृत पाणी योजनेच्या विहिरीत वळविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून दोन पाणीयोजना कार्यान्वित आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सांगळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)