मनपातही पाच दिवसांचा आठवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:58 IST2020-02-28T23:57:12+5:302020-02-28T23:58:07+5:30
राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे.

मनपातही पाच दिवसांचा आठवडा
नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. शनिवारपासून (दि. २९) त्याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने निर्णय घेतला असून, पाच हजार कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे. यातून रुग्ण सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.