साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:30 PM2020-05-30T22:30:26+5:302020-05-30T22:31:09+5:30

परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Five and a half lakh people buy home-made liquor | साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी

साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले

नाशिक :  कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता राज्य सरकारने मुंबई सह चार जिल्ह्यात दारू विक्रीस अनुमती न देता त्यांना ऑनलाईन घरपोच दारू खरेदीची मुभा दिल्याने गेल्या पंधरा दिवसात या चार जिल्ह्यात साडेपाच लाख लोकांनी घरपोच दारू खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संदर्भात माहिती राज्य सरकार ला दिली आहे. कोरोनामुळे राज्यातील मद्य विक्रीचे दुकाने गेली दीड महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळेच राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला, राज्य अगोदरच आर्थिक संकटात असताना त्यात उत्पनात कमतरता जाणवू लागल्याने सरकारने 3 मे पासून काही प्रमाणात मद्य विक्रीस अनुमती दिली, मात्र त्यातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 10791 मद्य विक्रीच्या परवाने पैकी 7291 परवाने सध्या सुरू आहेत. मुंबई सारख्या मोठ्या शहरात मद्य विक्री बंद ठेवल्याने त्याचा इतर व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने चार जिल्ह्यात घरपोच मद्यविक्री योजना सुरू केली आहे. या योजनेत 15 मे पासून आजतागायत 5 लाख, 52 हजार 637 ग्राहकांनी लाभ घेतला असून 29 मे रोजी एकाच दिवसात 58,231 ग्राहकांनी मद्य खरेदी केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई शहर व मुबंई उपनगर येथील 35,513 ग्राहकांचा समावेश आहे. सरकारने परवाना धारकांना मद्य विक्री करण्याची सक्ती केली असल्यामुळे 1 ते 28 मे दरम्यान राज्यात एक लाख, 2,712 इतक्या व्यक्तींना परवाने मंजूर करण्यात आले आहेत. लॉक डावूनच्या काळात पर राज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Five and a half lakh people buy home-made liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.