शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर आज प्रथमच नोटप्रेस कामगारांना रविवारची सुटी

By admin | Updated: December 31, 2016 23:18 IST

नोटाबंदीनंतर आज प्रथमच नोटप्रेस कामगारांना रविवारची सुटी

नाशिकरोड : केंद्र शासनाने ५०० व एक हजाराची नोट चलनातून रद्दबातल ठरविल्यानंतर गेल्या ५० दिवसांपासून चलार्थपत्र मुद्रणालयात अहोरात्र नोटा छपाईचे काम सुरू असून, सातही रविवारी सुट्टी न घेता काम करणाऱ्या कामगारांना नववर्षाच्या पहिल्या रविवारी काहिसा दिलासा मिळाला आहे. मुद्रणालय प्रशासन व कामगार नेत्यांमध्ये चर्चा होऊन रविवारी (दि. १ जानेवारी) कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांनी दररोज जादा वेळ काम करून विविध दरांच्या १०५० दशलक्ष नोटा (१०५ कोटी) छापल्या आहेत. शनिवारी सर्वाधिक ५१ दशलक्ष नोटा छापून रवाना करण्यात आल्या.  केंद्र शासनाने गेल्या ८ नोव्हेंबर रोजी देशाच्या चलनातून ५०० व एक हजाराची नोट चलनातून रद्दबातल ठरविल्या. यामुळे गेल्या ५० दिवसांपासून विविध दरांच्या चलनांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.  गेल्या ५० दिवसांत चलार्थपत्र मुद्रणालयातून शनिवारी (दि.३१) सर्वाधिक विविध दरांच्या ५१ दशलक्ष नोटा छापल्या. नोटा रद्दबातल ठरविल्यानंतर गेल्या ५० दिवसांत चलार्थपत्र मुद्रणालय कामगारांनी सलग सात रविवार सुट्टी न घेता व दररोज जादा वेळ काम करत विविध दरांचे चलन विविध अडचणीचा सामना करून यशस्वीपणे छापले आहे. मुद्रणालय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग, मानव संसाधन संचालक के.एस. सिन्हा, तांत्रिक संचालक अजय श्रीवास्तव यांच्यासोबत नुकतीच मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष सुनील आहिरे यांची बैठक झाली. यामध्ये गेल्या सात रविवार सुट्टी न घेता काम करणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालय कामगारांना रविवार १ जानेवारी रोजी सुट्टी देण्याची केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच यापुढे दररोज २ तास जादा काम करून रविवारी सुट्टी देण्यात यावी या मागणीवर विचार सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)