लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नाशिक जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या वतीने पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीने पाच लाख रूपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने द्वितीय, नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. तर चांदवड तालुक्यातील शिरसाणे, देवळा तालुक्यातील कणकापूर, कळवण तालुक्यातील पाळे बुद्रूक या ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.विभागस्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत माळेगाव ग्रामपंचायत यशस्वी ठरेल असा विश्वास सरपंच अनिल आव्हाड, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांनी व्यक्त केला. याबद्दल आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले आहे.
माळेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम
By admin | Updated: May 6, 2017 01:00 IST