शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:49 AM

प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही.

नाशिक : प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. अपघातानंतर लगेच मिळालेला प्रथमोपचार अगदी मोलाचा ठरतो तसेच कोणत्याही आजारात रुग्णांना प्रथमोपचाराची नितांत गरज लक्षात घेता याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.सामान्य नागरिकांना याबद्दल पूर्ण माहिती असणे महत्त्वाचे ठरते. यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास मोठी मदत होऊ शकते, असे मत शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी शनिवारी (दि. १४) होणाऱ्या प्रथमोपचार दिनाच्या पाार्श्वभूमीवर व्यक्त केले.जर एखाद्याने अपघातग्रस्त व्यक्तीस त्याची जखम ओळखून त्याला डॉक्टरकडे नेण्यापर्यंत विशिष्ट प्रथमोपचार केल्यास त्या व्यक्तीस जीवनदान मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही प्रथमोपचाराविषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक ठरते. यात सर्पदंश, हृदयरोग, भाजणे, डायबेटिस, कुत्रा चावणे, खरचटणे, हाड मोडणे, रक्तस्त्राव, चक्कर आदी आजारांत प्रथमोपचार केल्यास रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक ठरते. यामुळे तत्काळ मदत मिळण्यास मोठी मदत होते व रुग्णांना जीवनदान देण्यात यश येऊ शकते.कोणत्या आजारात कसा करावा प्रथमोपचारअपघात : अपघात झाल्यास बºयाचदा जखमीची पडजीभ मागे पडते आणि श्वास घेण्यास अडचण येते, त्यामुळे त्याची मान सरळ करावी, रक्तस्त्राव होत असल्यास बॅँडेज बांधावे, हाड मोडले असल्यास असा भाग स्थिर व्हावा यासाठी आधार देऊन संबंधितास मदत करणे.सर्पदंश : सर्पदंश झालेल्या भागाला साबणाने किंवा जंतुनाशक औषधाने त्याला साफ करावे. यानंतर दंक्ष झालेल्या भागाच्या वरती पट्टी किंवा रस्सीने घट्ट बांधावे जेणेकरून विष पूर्ण शरीरात पसरणार नाही व डॉक्टरांना उपचार करण्यास सोपे होईल.विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका : कृत्रिम हृदयक्रि या हा प्रकार यामध्ये उपयुक्त ठरतो. यामध्ये रुग्णाच्या छातीवर मसाज करावी व तोंडाने श्वास द्यावा. त्यानंतर छातीवर हाताने दाब द्यावा.उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने आपली नियमित घेण्यात येणारी गोळी नेहमी सोबत ठेवावी. ज्यावेळी अचानक भोवळ किंवा मेंदूत रक्तस्त्राव होईल यावेळी गोळी घेतल्यास आराम मिळू शकतो.पाण्यात बुडणे : सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या व्यक्तीस बाहेर काढून त्याच्या छातीवर दाब देऊन छाती, पोटातील पाणी बाहेर काढावे त्यांनतर कृत्रिम श्वसनासाठी त्या व्यक्ती तोंडाने श्वास द्यावा.कुत्रा चावणे : चावलेल्या ठिकाणाला सुरुवातीला साबणाने स्वच्छ धुवावे तसेच चावलेल्या भागाच्या वरील बाजूस पट्टी किंवा दोरीने घट्ट बांधावे.कोठे असायला हवी प्रथमोपचार पेटीसध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, यासाठी शहरातील प्रत्येक चौकात प्रथमोपचार पेटी असायला हवी तसेच महामार्गावर काही विशिष्ट ठिकाणांवर पेटी असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एसटी बस, खासगी बस, शासकीय तसेच खासगी कार्यालये, रेल्वे, शाळा, शाळेतील बस, मॉल्स, हॉटेल्स यांसारख्या सर्वच ठिकाणी प्रथमोपचार पेटी असणे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रथमोपचार पेटी दिसून येत नाही आणि असेल तर ती पूर्णपणे रिकामी असते. त्यामुळे याकडे महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.आपल्यावर कोणत्याही क्षणी कुठलीही आपत्ती ओढावू शकते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचाराची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. आपले जसे आधारकार्ड आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाला शासनाने मेडिकल कार्ड देणे गरजेचे आहे. त्यात रुग्णांच्या प्रमुख आजाराची, रक्तगटाची माहिती असायला हवी. - डॉ. मंगेश थेटे, माजी अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल