नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:54 IST2019-06-14T12:51:12+5:302019-06-14T12:54:39+5:30

शहरातील उंटवाडी परिसरातील  मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञातांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. हल्लेखोर फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून आले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करीत दक्षता दाखवत धोक्याचा अलार्म वाजविल्याने लुटारुंनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर बेच्छूट गोळीबार केला. त्यामुळे या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे

Firing at Muthoot Finance's office in Nashik, one killed | नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठार

नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठार

ठळक मुद्देमुथूट फायन्नांसच्या कार्यालयावर हल्लाहल्लेखोरांकडून कर्मचाऱ्यांवर बेछूट गोळीबार दरोडा टाकण्याच्या हेतून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज

नाशिक: शहरातील उंटवाडी परिसरातील  मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञातांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. हल्लेखोर फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून आले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करीत दक्षता दाखवत धोक्याचा अलार्म वाजविल्याने लुटारुंनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर बेच्छूट गोळीबार केला. त्यामुळे या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिकी मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला होता. 


उंटवाडी रोड  येथील मुथुत फायनान्स  इथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न पाच लुटारूंनी गोळीबार करीत यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा रुग्मालयात मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तत्काळ दाकल झाले असून पोलीसांनी शहरात नाकाबंदी करीत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हल्लेखोलांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरुवातीला फायनांन्सच्या कार्यालयात घुसताच कर्मचाऱ्यांचे व व ग्राहकांचे मोबाईल जमा करून घेतले. मात्र यादम्यान एका कर्मचाऱ्यांनी दक्षता दाखवून  ऑफीसमधाील धोक्याची सूचना देणारे अलार्व वाजवले यावरून हल्लेखोरांनी सताप व्यक्त करीत बेछुट गोळीबार केला. यात काही कर्मचारी व ग्राहकांना गोळ्या लागल्या असून एक जण गंभीर जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाकल केले असता एकाचा मृत्यू झाला असून इतरांवर रुग्णालायत उपचार सुरू आहे. 
 

Web Title: Firing at Muthoot Finance's office in Nashik, one killed