मुकणेच्या वनक्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:09 AM2019-12-23T01:09:44+5:302019-12-23T01:10:53+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

Fire in the forest area of the encampment | मुकणेच्या वनक्षेत्राला आग

मुकणेच्या वनक्षेत्राला आग

googlenewsNext
ठळक मुद्देदीड हेक्टर क्षेत्र बाधित : रोपवन थोडक्यात बचावले

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच येथील वन तपासणी नाक्यावरील वनरक्षकांसह नाशिक पश्चिम वन विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत पेटलेले गवत विझविले. या आगीत सुमारे दीड हेक्टरचा परिसर बाधित झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मुकणे येथील वनविभागाच्या डोंगरावर काही वर्षांपूर्वी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे चार हजार रोपांची लागवड व संवर्धन प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून केले जात आहे. याच डोंगरावर कोणीतरी अज्ञात इसमांनी दुपारच्या सुमारास धूम्रपान करताना अर्धवट जळालेली थोटके किंवा आगकाडी निष्काळजीपणे फेकल्यामुळे वाळलेल्या रानगवताने तत्काळ पेट घेतला. वाºयाचा वेग अधिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच प्रतिष्ठानच्या दहा ते बारा स्वयंसेवकांसह वनपाल मधुकर गोसावी, रोहिणी पाटील, योगेश खैरनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या वृक्षांच्या काही फांद्या तोडून त्याआधारे पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरावर आग असल्यामुळे आणि घटनास्थळापर्यंत जाण्याची वाटदेखील बिकट असल्याकारणाने अग्निशमन दलाची मदत घेता आली नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. नैसर्गिक पद्धतीने पेटलेले गवत वनरक्षक व वनमजुरांसह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विझवले. सुदैवाने या आगीत रोपवन सुरक्षित राहिले. रोपवनापासून लांब अंतरावर आग असल्यामुळे व वेळीच आग विझविण्याला प्रारंभ झाल्याने रोपांना फारशी झळ बसली नसल्याचा दावा वनविभागाच्या सूत्रांनी केला आहे.

Web Title: Fire in the forest area of the encampment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.