Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 15:34 IST2019-09-07T13:44:19+5:302019-09-07T15:34:41+5:30

महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली आहे.

Fire breaks out at karda Construction Office in Nashik | Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

ठळक मुद्देनाशिकमधील एका व्यावसायिक संकुलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली.कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक - नाशिकमधील एका व्यावसायिक संकुलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (7 सप्टेंबर) महात्मा नगर येथे एका व्यावसायिक संकुलात भीषण आग लागली आहे. मागील 2 तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरीही आग आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या 10 ते 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीने रौद्रवतार धारण केला असून जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. आगीची भीषणता लक्षात घेऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवळाली छावणी परिषद, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. भीषण आग असल्याने कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्या आहेत. तसेच कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: Fire breaks out at karda Construction Office in Nashik