नाशिकला भंगार बाजारात अग्नितांडव, तीस दुकाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 13:15 IST2023-02-24T13:15:20+5:302023-02-24T13:15:59+5:30

आगीमुळे काही सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Fire breaks out in scrap market in Nashik | नाशिकला भंगार बाजारात अग्नितांडव, तीस दुकाने जळून खाक

नाशिकला भंगार बाजारात अग्नितांडव, तीस दुकाने जळून खाक

नरेंद्र दंडगव्हाळ -

नाशिक - सिडको जवळील चुंचाळे शिवारातील घरकुल योजने जवळील भंगार दुकानाला आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीमुळे काही सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

अग्नितांडवाचा फटका कचरा वेचून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांना बसला असून सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत.आगीची माहिती मिळताच सिडको, सातपूर,अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहीचल्या. भंगारात रबर,टायर व प्लास्टिक चा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने भीषण रूप धारण केले असून अजूनही आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Web Title: Fire breaks out in scrap market in Nashik