नाशिक : भद्रकाली फ्रूट मार्केट परिसरात अनधिकृतपणे फटाके विक्री करणाऱ्या चार दुकानदारांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़भद्रकाली फ्रूट मार्केटमध्ये फटाके विक्री करणारे जगन्नाथ करपे, शैलेश बुराडे, मधुकर भागवत व नाना भागवत असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ या सर्वांवर विनापरवानगी फटाके विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}