शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

By admin | Updated: August 15, 2014 00:28 IST

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १५ संचालकांनी कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अवघड असल्याचे सांगत आपल्या संचालकपदाचे राजीनामे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालक डी. बी. मोगल म्हणाले की, कारखान्याची आर्थिक परिस्थिती, कर्जाचा वाढलेला डोंगर, संचित तोटा, उसाचा अनियमित पुरवठा यामुळे कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अशक्यच असून, कारखाना सरकारी मदतीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे सांगितले. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्यांनाही निमंत्रण दिले होते. परंतु नारायण शिंदे हे सभासद वगळता एकही सभासद उपस्थित राहिला नसल्याने सभासद आमच्या राजीनाम्याच्या निर्णयाशी सहमत असल्याचे डी. बी. मोगल म्हणाले.कारखाना चालू रहावा यासाठी सहभागी तत्त्वावर किंवा खासगी तत्त्वावर चालविण्यास द्यावा, यासाठी संचालकांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु सहभागी किंवा खासगीत चालविण्यास दिल्यास तालुक्यातील राजकारण्यांना कारखान्याची सत्ता उपभोगता येणार नाही त्यामुळे केवळ राजकारणासाठी कारखान्यांची वाताहात पुढाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप मोगल यांनी केला. संचालक बाळासाहेब जाधव यांनी कारखान्याची संपूर्ण आर्थिक परिस्थिती विशद करून कारखाना सहभागी तत्त्वावर देण्यासंदर्भात २९ मे २०१२ चे सभेत कोअर कमिटीचे अहवालावर निर्णय घेण्याचे ठरले. कारखान्याचे संचालक मंडळ अस्तित्वात असताना कमिटी तयार करण्याचा निर्णय दुर्दैवी होता. कारखान्यांचा संचित तोटा १५० कोटी बँका, शासकीय व इतर देणी २६६ कोटी ३७ लाखांची असल्याने सहकारी तत्त्वाऐवजी शासकीय स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी संचालकपदाचे राजीनामे देत असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले. संचालक देवराम मोगल, बाळासाहेब जाधव, अ‍ॅड. शांताराम बनकर, हिरालाल सानप, दिलीपराव मोरे, अंबादास कापसे, उद्धव कुटे, बबनराव पानगव्हाणे, दिनकर मत्सागर, लक्ष्मणराव टर्ले, एकनाथ डुंबरे, बबनराव सानप, शहाजी डेर्ले, दौलतराव मुरकुटे, श्रीमती गंगूबाई कदम आदि १५ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे भंडारे यांच्याकडे दिले. सदर राजीनामे पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांच्याकडे पाठविणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले आहे.दिलीपराव बनकर, राजेंद्र कटारनवरे, शिवाजी गडाख यांच्यासह सुभाष होळकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. परंतु त्यांनी पुढे कोणत्याही कामकाजात सहभाग घेतला नाही. विद्यमान अध्यक्ष भागवत बोरस्ते, रावसाहेब रायते, कचरू राजोळे, सौ. सिंधुताई खरात, सौ. लीलावती तासकर हे यावेळी अनुउपस्थित होते. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिलेले नाहीत. (वार्ताहर)वक्तृत्व स्पर्धेत दिव्या साळुंके तृतीयसिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या संजय साळुंके हिने मविप्रच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.