वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:05 IST2020-06-20T23:03:47+5:302020-06-20T23:05:18+5:30
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर येथे अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा उद्यान ...

वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल
ठळक मुद्देमहापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर येथे अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा उद्यान निरीक्षक सचिन देवरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डीजीपीनगर येथे बसस्टॉपसमोर एका निलगिरीची फांदी तोडलेली तर तीन सुबाभूळ झाडांचे नुकसान केले असून, याबाबत महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती.