शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

भरधाव जीपची ‘बीट मार्शल’ला धडक; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 7:00 PM

पंचवटी : नाशिककडून गुजरातकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपने चारचाकीला धडक देऊन चौफुलीवरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या म्हसरूळ पोलीस ...

ठळक मुद्देम्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदोन्ही पोलीस कर्मचारी दूरवर फेकले गेलेटेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते

पंचवटी : नाशिककडून गुजरातकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपने चारचाकीला धडक देऊन चौफुलीवरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलला उडविल्याची घटना सोमवारी (दि.१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पेठरोडवर घडली. या घटनेत रात्री गस्तीवर असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याचे दोघे बीट मार्शल कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत तर अपघातानंतर वाहनचालक वाहन सोडून फरार झाला होता; मात्र त्यास दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी नंदू जाधव व राजेश लोखंडे असे दोघेजण रात्रपाळीच्या गस्तीवर असताना पेठरोडवरील पोलीस चौकीशेजारी उभे होते. यावेळी पेठरोडने गुजरातकडे भरधाव द्राक्ष घेऊन जाणाऱ्या जीपने (एमएच १७, बीवाय ९०७०) मखमलाबादकडे जाणा-या चौफुलीवर मिनी टेम्पोला (एमएच १५, एफइ १३५३) धडक दिली. जीपचा वेग इतका होता की या धडकेनंतरही चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही व जीप पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाऊन आदळली. यामुळे दोन्ही पोलीस कर्मचारी दूरवर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी बॅरिकेडदेखील तुटले तसेच सर्वत्र द्राक्षांचा खच पडलेला होता. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमी पोलिसांना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले, तर अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातातील जखमी जाधव व लोखंडे या दोघाही पोलीस कर्मचा-यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.---

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात