शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात पंचरंगी लढती

By admin | Updated: November 11, 2016 23:53 IST

शहर विकास आघाडीचे आव्हान : २१ जागांसाठी ९२ उमेदवार

सटाणा : नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना आणि शहर विकास आघाडी हे पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या एकवीस जागांसाठी ३८ उमेदवारांनी माघार घेतली. दहा प्रभागांमधून आता ९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे थेट अध्यक्षपदासाठी पंचरंगी, तर बहुतांश प्रभागात पंचरंगी, षष्ठरंगी, सप्तरंगी लढती रंगणार आहेत. माघारीची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला नगरसेवकपदाच्या २१ जागांसाठी १४८ उमेदवारांनी २७६ उमेदवारी अर्ज दाखल केलेले असतांना अर्ज छाननी मध्ये तब्बल १४६ अर्ज बाद करण्यात आले होते.बहुतांश उमेदवारांनी एकाच प्रभागात दोन,तीन,चार असे अर्ज केल्यामुळे तर काही उमेदवारांना सबंधित पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेकांचे अर्ज बाद झाले होते.अर्ज छाननीनंतर १० प्रभागांमध्ये एकूण १३० जणांचे उमेदवारी अर्ज होते. तरी निवडणुकीचे खरे चित्र माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट होणार असल्याने शहरवासियांचे लक्ष लागून होते. कोणत्या प्रभागात कोणाची माघार प्रभाग क्र मांक १ (अ) मध्ये डॉ. मिच्छंद्रनाथ सूर्यभान बर्डे यांनी माघार घेतली आहे. प्रभाग १ अ मध्ये गिरीश अनिल कुंवर , तेजस वामन गवळी, कांतीलाल लक्ष्मण चव्हाण, दिलीप शिवाजी निकम ,बाळू उत्तम बागुल ,शंतनू लक्ष्मण सोनवणे या सहा उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.(ब) मधून सुशीला दादाजी रौंदळ आणि रोहिणी सुहास पवार यांची माघार; प्रभाग क्र मांक २ (अ) विजयराव किसनराव वाघ आणि सुमित विजयराव वाघ या पितापुत्रांची माघार; (ब) मधून मीना निवृत्ती सोनवणे यांची माघार; प्रभाग क्र मांक ४ (अ) संगीता देवेंद्र सोनवणे यांची माघार; (ब) मधून महेंद्र धोंडू खैरनार , यमाजी सोनवणे , विजयराव वाघ , भूषण सोनवणे यांची माघार, प्रभाग क्र मांक 6 (अ) पंकज ततार,अमोल देवर, परेश देवरे, राजेंद्र देवरे, जगदीश मुंडावरे,कैलास येवला या सहा उमेदवारांची माघार, प्रभाग ७ (ब) वैशाली सोनवणे यांची माघार; प्रभाग ८ (अ) योगिता पाकळे यांची माघार; (ब) दीपक नंदाळे यांची माघार; प्रभाग ९ (अ) अस्मिता पवार आणि मुकुंद बस्ते यांची माघार, दिलीप दावल ; (ब) निर्मला सोनवण, पूजा सुपडू नानकर, मुल्ला शमीम शफिक,े यशोदा अहिरे, कौशल्या सोनवणे या पाच उमेदवारांची माघार, (क) शेख रशिदाबी मुख्तार,शेख सिरीन सादिक,शेख सायरा भिकन,सिंधुबाई सोनवणे, मन्सुरी शमा आरिफ यांनी माघारी घेतली आहे.(वार्ताहर)