महिलांची सोन्याची पोत खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:19 IST2018-10-26T23:16:21+5:302018-10-27T00:19:21+5:30
अशोका मार्ग तसेच आकाशवाणी टॉवर परिसरातून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळ व रात्रीच्या सुमारास घडली़

महिलांची सोन्याची पोत खेचली
नाशिक : अशोका मार्ग तसेच आकाशवाणी टॉवर परिसरातून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळ व रात्रीच्या सुमारास घडली़
शोभा महाजन (४५, जयहिंद कॉलनी, तळोदा रोड, नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास अशोका मार्गावरून पायी जात असताना दुचाकीवर काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ घडली़ गंगापूर रोडवरील आर्या अपार्टमेंटमधील रहिवासी प्रतिभा बोरसे (५८) या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आकाशवाणी टॉवरच्या भिंतीलगत असलेल्या गोदावरी बिल्डिंगसमोरून पायी जात होत्या़ यावेळी दुचाकीवर काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़