उत्कृष्ट कार्याबद्दल जाधव यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:16 IST2018-10-26T22:53:11+5:302018-10-27T00:16:40+5:30
एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.

एकलहरे ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सरपंच मोहिनी जाधव यांचा सत्कार करताना भास्करराव पेरे. समवेत ग्रामपंचायत सदस्य.
एकलहरे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत एकलहरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच मोहिनी जाधव यांनी आदिवासी विकास, दारूबंदी, महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता अभियान यासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन नाशिक सरपंच संसद कार्यक्रमात आदर्श ग्राम पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्करराव
पेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
सत्कारास उत्तर देताना सरपंच मोहिनी जाधव म्हणाल्या की, सत्कारामुळे मला अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल. यावेळी ग्रामपंचायत सदस्या निर्मला इंगळे, सुरेखा जाधव, रुपाली कोकाटे, सागर जाधव आदी उपस्थित होते.