येवला : तालुक्यात नियमित वीजपुरवठा होत नाही. विजेअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. पाण्यावाचून पिके करपत आहे. शेतकऱ्यांच्या वाड्यावस्त्यावर जळलेले विद्युत जनित्र तत्काळ बदलावे आणि शेतकऱ्यांना तत्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० कार्यकर्ते वीज वितरण कंपनीच्या येवला कार्यालयासमोर मंगळवारी (दि. ६) उपोषणास बसले आहेत.येवला तालुक्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर असताना काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पाणी नाही, पावसावाचून पिके करपली, तर काही ठिकाणी पाऊस झाला. तेथे विजेअभावी शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाही. त्यामुळे हातची पिके जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. असे असताना काही ठिकाणी जनित्र जळाले. (वार्ताहर)
येवल्यात शिवसेनेतर्फे उपोषण
By admin | Updated: September 6, 2016 22:30 IST
विद्युत जनित्र नादुरुस्त : शेतकऱ्यांना तत्काळ वीज देण्याची मागणी
येवल्यात शिवसेनेतर्फे उपोषण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}