शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

उडीद, सोयाबीन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:10 AM

केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरू होऊनही शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देफेडरेशनकडून मुदतवाढ : डिसेंबरमध्ये खरेदीची शक्यता

नाशिक : केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरू होऊनही शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.दरवर्षी शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाची बाजारात आवक वाढली की, व्यापाºयांकडून मालाचा भाव पाडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होते. खुल्या बाजारात शेतकºयांची व्यापाºयांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकºयांनी उत्पादित केलेला माल खरेदी केला जातो. त्यासाठी सदर मालाला आधारभूत किंमत निश्चित केली जाते. गेल्या वर्षीही जिल्ह्णात अशाच प्रकारे उडीद, मूग, सोयाबी, मका, तूर या पिकांना हमीभाव देऊन शासनाने खरेदी केली होती. यंदाही आॅनलाइन पद्धतीने शेतकºयांना त्यांचा उत्पादित माल खरेदी करण्याच्या सूचना मार्केट फेडरेशनला देण्यात आल्या आहेत. यात प्रारंभी शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यासाठी शेतकºयांचे आधार क्रमांक, बॅँक खाते क्रमांक, सातबारा उताºयावर पिकाची नोंद, एकूण हेक्टर आदी बाबींची नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी मार्केट फेडरेशनने जाहिरात देऊन बाजार समित्या, खरेदी-विक्री संघांना आवाहन केले होते. मात्र येवला खरेदी-विक्री संघानेच त्यासाठी तयारी दर्शविली आहे.यंदा शासनाने गत वर्षाच्या तुलनेत हमीभावात वाढ केली असून, उडिदासाठी ५७०० रुपये क्विंटलला दर देण्यात आला असून, गेल्या वर्षी ५६०० इतका भाव होता. तर मूगसाठी ७०५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. गतवर्षी ६९७५ इतका दर होता. सोयाबीनसाठी ३७१० रुपये दर देण्यात आला आहे. गेल्या वर्षापेक्षा तीनशे रुपयांनी हा दर अधिक आहे. शासनाने १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिली होती. मात्र या काळात जेमतेम दहा ते बारा शेतकºयांनीच नोंदणी केली आहे. नोंदणीला शेतकºयांचा प्रतिसाद न मिळाल्याचे पाहून पणन महामंडळाने पुन्हा एक आणखी मुदतवाढ दिली आहे. त्यात आता उडीद, सोयाबीनसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, मूगाची नोंदणी ३१ आॅक्टोबरपर्यंत करता येणार आहे. नोंदणीनंतरच साधारणत: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेडरेशनकडून खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे.मका खरेदीसाठी परवानगीची प्रतीक्षालवकरच शेतकºयांचा मका बाजारात येणार असून, यंदाही फेडरेशनकडून मका खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रे सुरू करण्यासाठी मार्केट फेडरेशनने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्ह्णातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर, देवळा, नामपूर, लासलगाव व चांदवड या नऊ ठिकाणी आॅनलाइन नाव नोंदणी केंद्रे सुरू करावयाची आहेत. प्रशासनाकडून अनुमती मिळाल्यावर हे केंद्रे कार्यान्वित होतील. मक्याला यंदा शासनाने १७६५ रुपये क्विंटल भाव निश्चित केला आहे. बाजारात मका येण्यास सुरुवात झाली असून, त्याचा दर मात्र दोन हजार ते २२०० रुपये इतका आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती