शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी ए. जी. दातीर यांनी केले आहे. शासन निर्णय कृषि व पदुम विभाग मंत्रालय ५ जुलै २०१४ अन्वये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व भारतीय कृषि विमा कंपनीच्या सहकार्याने विविध पिकांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेत सहभाग घेण्यासाठी दि. ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने राष्ट्र्ीय कृषि पिक विमा योजनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल या हेतूने ही पीक विमा योजना राबविण्यात आलेली असल्याची माहिती तालुका कृषि कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दातीर यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयात संपर्क साधन्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पीक विमा योजनेत सर्वसाधारण जोखीम स्तर पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला आहे. त्यात भात पिकासाठी ६० टक्के जोखीम असून प्रति हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम १५ हजार ठरविण्यात आली आहे. पुढील पिकांची (कंसात जोखीम) विमा संरक्षित रक्कम पुढील प्रतिहेक्टरी प्रमाणे: बाजरी- (६० टक्के) ६४००, मका-(६०)२१ हजार ४००, मूग- (६०)१२ हजार १००, भूईमूग- (६०) २३ हजार ८००, कांदा- (६०) ९७ हजार, सुरु उस- (८०) एक लाख ४४ हजार ३००, खोडवा (८०) एक लाख २४ हजार ३०० रुपये आहे. (वार्ताहर)