द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकºयाचे थकीत पैसे मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 20:49 IST2020-09-12T20:46:32+5:302020-09-12T20:49:10+5:30
दिंडोरी : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे द्राक्ष व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयाचे थकीत पैसे तातडीने मिळाले. यामुळे शेतकºयाने समाधान व्यक्त केले तर शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवणाºया व्यापाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे.

द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकºयाचे थकीत पैसे मिळाले परत
दिंडोरी : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे द्राक्ष व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयाचे थकीत पैसे तातडीने मिळाले. यामुळे शेतकºयाने समाधान व्यक्त केले तर शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवणाºया व्यापाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे.
दिंडोरी तालुक्यातील गेल्या द्राक्ष हंगामातील पैसे व्यापारी वर्गाकडे मोठ्या प्रमाणात अडकलेले होत.े व्यापारी वर्गाकडून शेतकरी बांधवांना गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी पैशाची मागणी केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती. परंतु नुकºयाच नाशिक येथे कार्यभार सांभाळणारे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कार्यभार हाती घेताच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी त्यांची भेट घेतली असता शेतकºयांचे पैसे बुडवू पाहणाºया व्यापारी वर्गाला शेतकºयांना फसवाल तर गाठ माझ्याशी आहे हे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाले. या बातमी व्हाट्सअप वर व्हायरल झाले असता दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे येथील शेतकरी पंढरीनाथ ढोकरे यांनी या बातमीचे कात्रण त्यांचा द्राक्षांची खरेदी करणाºया लुधियाना येथील व्यापारास पाठवले व आम्ही शेतकरी वर्ग प्रताप दिघावकर यांचेकडे तक्र ार करणार असल्याचे या व्यापाºयास सांगितले असता व्यापाºयाने घाबरून जात पंधरा मिनिटात १,५०००० रु पये ढोकरे यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले.
संबंधित शेतकºयांसह खडक सुकेणे येथील विलास कळमकर, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, केशव ढोकरे, मधुकर फुगट, नारायण गणोरे, मनोज गणोरे, भाऊसाहेब पालखेडे, प्रशांत गणोरे यांनी याबाबत विशेष महापोलिस निरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली व आभार मानले व इतर शेतकºयांचे अडकलेले पैसे लवकरात लवकर मिळावे याबाबत निवेदन दिले.
केवळ एका बातमीच्या कात्रणामुळे व्यापारी वर्गाकडे अडकलेले शेतकºयांचे पैसे मिळाल्याबद्दल शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे .