विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 00:31 IST2021-08-17T00:30:46+5:302021-08-17T00:31:08+5:30
येवला : तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. कासारखेडा येथे ...

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
येवला : तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
कासारखेडा येथे विहिरीतून पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी तेजस अण्णा गायकवाड (३०) याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटना शुक्रवारी, (दि.१३) दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.