कुटुंब कबिला घरात; शेतीकामे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:08 IST2020-04-12T20:54:35+5:302020-04-13T01:08:35+5:30
जळगाव नेऊर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे सर्वांना स्थानबध्द व्हावे लागले असले तरी ग्रामीण भागात याचा परिणाम वेगळा जाणवत असून सारा कुटुंब कबिला घरात एकवटल्याने शेतीकामे जोमात सुरू आहेत.

कुटुंब कबिला घरात; शेतीकामे जोमात
जळगाव नेऊर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे सर्वांना स्थानबध्द व्हावे लागले असले तरी ग्रामीण भागात याचा परिणाम वेगळा जाणवत असून सारा कुटुंब कबिला घरात एकवटल्याने शेतीकामे जोमात सुरू आहेत. लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरी असल्याने शेतीची कामे उरकती घेतली जात आहेत. अनेक कुटुंबे शेतीकामात रमली आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विवाह मुहूर्त असतात; पण यावर्षी मात्र कोरोना संसर्गाने विवाह लांबणीवर पडले आहेत. तसेच नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी बाहेर गावी असणारे सर्व एकत्र आले आल्याने घरात बसून राहण्याऐवजी शेतीकामालाच महत्त्व दिले जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सकाळ आणि दुपारी शेतीची कामे केली जात असल्याने अनेक कुटुंबे शेतीकामांत व्यस्त झाले आहेत. सध्या शेतीमध्ये रब्बी हंगामातील कांदा काढणी, कांदा चाळीत भरणे, गहू काढणे ही कामे सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांनी हाती नांगर धरला आहे, काहींनी पिके काढून खरिपासाठी शेती तयार करण्याची कामे सुरू केली आहेत.
रब्बी पिकाच्या काढणीनंतर शेती नांगरणी, शेणखत पसरवणे, ही कामे लॉकडाउनमुळे सर्व जण घरी असल्याने एक महिनाभर अगोदर होत असुन सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कामे केली जात आहेत.