शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात पुन्हा घसरण

By admin | Updated: September 10, 2016 00:42 IST

येवला : शेतकरी अडचणीत; हमीभावाच्या मागणीसाठी आक्रमक

 येवला : शुक्रवारी कांदा बाजारात उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली, तर अंदरसूल बाजारात तीन हजार क्विंटल कांदा आला. दोन्ही बाजारात कांद्याच्या भावात शुक्र वारी पुन्हा घसरण झाली आणि ३५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.येवला बाजारात उन्हाळ कांद्याचा भाव केवळ किमान १०० ते ५८० रुपयांपर्यंत होते. सरासरी ३५० रुपये क्विंटल भाव होते तर अंदरसूल मार्केट यार्डवर कांद्याचा बाजारभाव केवळ किमान १०० ते ६१५ रुपयांपर्यंत असून, ४०० रुपये क्विंटल असे होते. कांद्याच्या भावात सतत घसरण चालू आहे. कांदा मार्केटला विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याबाबत उदासीन असलेल्या शासनाच्या धोरणाबाबत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.राज्यासह देशांतर्गत व परदेशात स्थानिक पातळीवर कांद्याची आवक वाढल्याने कांदा भावात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती औजारे व मजुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये प्रतिक्विंटल झाला. आणि मातीमोल ३५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने संतप्त सवाल शेतकरी बाजार आवारात विचारीत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या वाईट दिवस आले असून, दिवसेंदिवस यात भर पडत आहे. यापुढील पीक घेण्यासाठी उपलब्ध कांद्याला भाव मिळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)