बांधकामाच्या साइटवरून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:19 IST2018-09-21T18:18:07+5:302018-09-21T18:19:35+5:30

नाशिक : शालिमार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या जिन्यावरून पडून विहितगाव येथील बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२०)घडली़ अंबादास रामजी पठाडे (५०, नवीन मराठी शाळेजवळ, विहितगाव, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

 Falling from the construction site, the death of the laborer | बांधकामाच्या साइटवरून पडून मजुराचा मृत्यू

बांधकामाच्या साइटवरून पडून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देविहितगाव येथील बांधकाम मजुर

नाशिक : शालिमार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या जिन्यावरून पडून विहितगाव येथील बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२०)घडली़ अंबादास रामजी पठाडे (५०, नवीन मराठी शाळेजवळ, विहितगाव, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिमार परिसरातील एस. कुमार शोरूमच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साइटवर बुधवारी (दि़१९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास पठाडे काम करीत होते़ यावेळी जिन्यावरून ते खाली पडल्याने त्यांच्या पाठीला जबर मार लागल्याने त्यांना पत्नी वंदना हिने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़

मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने पठाडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी दुपारी त्यांचा उपचारारदरम्यान मृत्यू झाला. या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Falling from the construction site, the death of the laborer