शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

‘भाऊबंदकी’चा सामना

By admin | Updated: November 15, 2016 00:39 IST

सिन्नरकरांच्या नजरा : चोथवे बंधूंच्या लढाईसोबतच ‘अपक्षा’चा ‘कस’

शैलेश कर्पे  सिन्नरशहरात सर्वात लक्षवेधी आणि राजकीय प्रतिष्ठेची लढत प्रभाग ५ ब मध्ये होत आहे. सख्खे चुलतबंधू असलेल्या चोथवे या प्रतिष्ठित व व्यावसायिकांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी सामना रंगत आला आहे. शिवसेनेचे उमेदवार व नगरसेवक प्रमोद झुंबरलाल चोथवे यांच्या विजयासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांची, तर भाजपाचे उमेदवार संजय गंगाधर चोथवे यांच्या विजयासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. चोथवे बंधूंच्या या कडव्या झुंजीत अपक्ष उमेदवार नगरसेवक हर्षद प्रभाकर देशमुख यांचाही कस लागणार आहे. प्रभाग ५ ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या या लढतीत हायप्रोफाईल उमेदवार असल्याने शहरवासीयांच्या नजरा साहजिकच या लढतीकडे लागल्या आहेत. भाजपा, सेना, राष्ट्रवादी व अपक्ष असे चार उमेदवार एका जागेसाठी आपले नशिब अजमावत आहेत. एका जागेसाठी चौरंगी लढत दिसत असली तरी खरा सामना तिरंगी होणार आहे. भाजपाचे उमेदवार संजय चोथवे, शिवसेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे व अपक्ष उमेदवार हर्षद देशमुख यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा राजकारणातला दांडगा अनुभव असून, ते आमदार राजाभाऊ वाजे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात. प्रमोद चोथवे यांनी दोनवेळा लोकनियुक्त, तर एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेच्या कारभारात सहभाग घेतला आहे. गेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले व प्रमोद चोथवे यांची लक्षवेधी लढत झाली होती. त्यात प्रमोद चोथवे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर वाजे गटाकडून त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेवर वर्णी लावण्यात आली होती. समाजकार्यात अग्रेसर असणारे प्रमोद चोथवे शहरातील प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होतांना दिसतात. निम्म्या रात्री मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांना आपलेसा करतो. अनुभव, कार्यकर्त्यांचा संच, राजकारणातील खाचाखोचा, नित्यसंपर्क या जोरावर शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा सामना करण्यासाठी भाजपाने त्यांचे सख्खे चुलत बंधू व कापड व्यावसायिक संजय गंगाधर चोथवे यांना निवडणूक रिंगणात उतरवून लढतीत रंगत आणली आहे. व्यावसायिक असल्याने डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून संजय चोथवे प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत. गेल्या निवडणुकीत राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना संजय चोथवे यांनी माजी आमदार कोकाटे यांच्या गटाकडून ऐनवेळी उमेदवारी केली होती.