शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात योजनेस मुदतवाढ

By admin | Updated: December 31, 2016 22:56 IST

लासलगाव : बाजारभाव स्थिर राहण्यास होणार मदत; उद्योग मंत्रालयाची अधिसूचना

लासलगाव : भारतातून कांदा निर्यातीसंबंधी चालू असलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०१७पर्यंत वाढविली असल्याने कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने मदत होईल, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. भारतातून कांदा निर्यातीसंबंधी चालू असलेल्या एमईआयएस योजनेची वाढविण्याबाबत दिल्लीत सभापती जयदत्त होळकर यांनी वाणिज्य व परराष्ट्र व्यापारमंत्री निर्मला सीतारामन व परदेश व्यापार मंत्रालयात संचालक ए.के. भल्ला यांची समक्ष भेट घेतली व कमी झालेल्या कांदा भावाची माहिती देऊन मुदत वाढवावी, अशी मागणी केली. त्यामुळे दि. ३० डिसेंबरला रात्री उशिरा अधिसूचना परदेश व्यापार मंत्रालयात संचालक ए.के. भल्ला यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली. या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सदर योजनेची मुदत वाढवावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी मागील सप्ताहात केली होती. केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या एमईआयएस योजनेंतर्गत दि. ३१ डिसेंबरपर्यंत पाठविण्यात येणाऱ्या कांद्यास ५ टक्के एमईआयएस दर लागू राहील, असे केंद्र शासनाने जाहीर केलेले होते.  मात्र सदर योजनेची मुदत शनिवारी संपणार असल्याने त्यापूर्वी केंद्र शासनाने सदर योजनेची मुदत न वाढविल्यास त्याचा कांदा निर्यातीवर परिणाम होऊन पर्यायाने कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)